भारत हा कृषिप्रधान देश आहे, भारतातील ७०% जनता खेड्यामध्ये राहते आणि खेड्यातील बहुतांश लोक हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. आणि शेती बोलली म्हणजे संकट आलीच; महापूर, चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी, शेतीला लागणारे भांडवल, मालाचा भाव. अशा संकटाना तोंड देत शेतकरी आपलं आणि देशांचं पोट भरत असतो. नैसर्गिक संकट येत, तेव्हा हातातोंडाशी आलेला घास गेल्याची भावना त्यांच्या मनामध्ये येते, शेतकरी अक्षरशः कोलमडून पडतो, हतबल होतो कारण त्याच्या हातात काहीच नसते; अशी म्हण आहे ना “राजाने मारले, आणि पावसाने झोडपले तर न्याय कोणाकडे मागणीचा?” अशा नैराश्यग्रस्त शेतकऱ्यानसाठी केंद्र सरकार “प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY” द्वारें आशेचा किरण घेऊन आली आहे. या योजनेतून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले जाईल ते कसे ते आपण संक्षिप्त स्वरूपात पाहू.
भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, यांनी सन २०१६ पासून भारतीय शेतकऱ्यांसाठी “प्रधानमंत्री पीक विमा योजना” लागू केली. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांसाठी सर्वसमावेशक जोखीम संरक्षण सुनिश्चित केली जाते. यामुळे प्रत्येक विमा धारक शेतकऱ्यांच्या पिकांना; पेरणीपूर्वीपासून काढणीनंतरच्या सर्व नैसर्गिक धोक्यांपासून संरक्षण मिळते. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
भारत सरकार आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या प्रयत्नाने हि योजना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि स्वयं-प्रशासन सह चालविली जाते, या योजनेमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेमध्ये घोटाळा होण्याचे प्रमाण नसल्यासारखेच आहे. या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून www.pmfby.gov.in ऑनलाईन पद्धतीने शेतकरी अर्ज करू शकतो, याशिवाय हा अर्ज बँकेच्या माध्यमानेही केला जातो. सुरवातीच्या काळात हि योजना बंधंनकारक होती परंतु नंतर ती शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक करण्यात आली.
What are the objectives of Fasal Bima Yojana? प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
भारतीय शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनासाठी समर्थन देणे या उद्देशाने “प्रधानमंत्री पीक विमा योजना” सुरु करण्यात आली आहे :
- नैसर्गिक संकटामुळे पिकांचे काही नुकसान झाले तर विमा धारक शेतकर्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे
- शेतकऱ्यांचे आयुष्मान सुधारणे जेणेंकरुनि ते आपले शेतीचे काम आणखी जोमाने करतील
- शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे.
- शेतकऱ्यांची पत योग्यता सुनिश्चित करणे, पीक विविधीकरण आणि वाढ करणे
What is the premium rate for PMFBY? PMFBY साठी दाव्याची रक्कम किती आहे?
या योजनेचे विमा शुल्काचे दर नक्की केलेले आहेत ते पुढीलप्रमाणे
हंगाम | पीक | शेतकऱ्यानकडून देय असलेले कमाल विमा शुल्क (विमा रकमेची टक्केवारी) |
---|---|---|
खरीब | अन्नधान्य, तेलबिया (कडधान्ये, ज्वारी) | विमा रक्कम किंवा विमा दराची 2.0% (जे कमी असेल) |
रब्बी | अन्नधान्य, तेलबिया (कडधान्ये, ज्वारी) | विमा रक्कम किंवा विमा दराची 1.5% (जे कमी असेल) |
खरीब आणि रब्बी | वार्षिक व्यावसायिक किंवा वार्षिक बागायत पीक | विमा रक्कम किंवा विमा दराची 5% (जे कमी असेल) |
What is crop insurance claim? पीक विमा दावा म्हणजे काय?
शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 72 तासांच्या आत पीकांच्या नुकसानाची माहिती कृषी विभागाला द्यावी लागेल व त्यानंतर लगेच अर्ज करावा लागेल. पिकाच्या नुकसानीचे कारणं द्यावी लागतील, उदा. कोणत्या पिकाची पेरणी केली, कोणत्या क्षेत्रात पिकाचे नुकसान झाले, हे सर्व तपशील फॉर्ममध्ये द्यावे लागतील. त्यासोबत जमिनीशी संबंधित माहिती आणि विमा पॉलिसीची एक छायाप्रत (Xerox) द्यावी लागेल.
नुकसान मूल्यांकन आणि दाव्यांच्या पेमेंटसाठी कालमर्यादा
कृषी विभागाला माहिती मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत नुकसानाचे मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. नंतर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडून नुकसानाचे मूल्यांकन किमान 7 आणि कमाल 20 दिवसांच्या आत पूर्ण केले जाईल. मूल्यांकनाच्या प्रक्रिये नंतर पुढील 10 दिवसात (प्रिमियम पावतीच्या अधीन) शेतकऱ्यांचे पूर्ण पेमेंट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पाठवले जाईल.
How to claim PMFBY online? PMFBY चा ऑनलाइन दावा कसा करायचा?
- सर्वप्रथमम अधिकृत वेबसाइट www.pmfby.gov.in वर जाऊन, उजव्या हाताच्या वर भाषा बदलण्याचा पर्याय आहे तिथे क्लिक करून मराठी भाषा निवडावी म्हणजे सोपे जाईल.
- मुख्य पानावर पहिलाच बॉक्स “शेतकऱ्याचा अर्ज” दिसेल,
- त्या बॉक्स वर क्लिक केल्यानंतर नवीन पॉपअप “Farmer Application” उघडेल
- Guest Farmer (म्हणजे जे शेतकरी या संकेत स्थळावर रजिस्टर नाहीत असे) वर क्लिक करा मग आणखी एक नवीन विंडो उघडेल.
- नवीन विंडो मध्ये Register for New Farmer User असा मथळा (Title) दिसेल
- त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी आणि महत्वाचे म्हणजे इथे विचारलेली सर्व माहिती देणे आवश्यक आहे कारण त्याशिवाय रेजिस्ट्रेशन अर्ज सबमिट होणार नाही.
- सर्वात शेवटी कॅप्चा कोड टाकून Create User या बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करावा.
How to check PMFBY beneficiary status? अर्जाची सध्याची स्थिती कशी पाहायची?
पंतप्रधान पीक विमा योजनेचा दावा केल्यानंतर त्याची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmfby.gov.in वर जाऊन त्यांची स्थिती तपासू शकतात, ती कशी ते आपण पाहूया
- सर्वप्रथमम अधिकृत वेबसाइट pmfby.gov.in वर जाऊन, उजव्या हाताच्या वर भाषा बदलण्याचा पर्याय आहे तिथे क्लिक करून मराठी भाषा निवडावी म्हणजे सोपे जाईल.
- मुख्य पानावर वेगवेगळ्या रंगांचे बॉक्स दिसतील, त्या बॉक्स मधील “पॉलिसीची स्तिथी (Application Status) “या बॉक्स वर क्लिक करा.
- नंतर Check application Status चा एक पॉपअप उघडेल, Reciept Number (म्हणजे नुकसानभरपाईचा अर्ज केला त्या अर्जाचा नंबर म्हणजे पावती क्रमांक) टाकावा.
-
शेवटी जे इंग्रजी मुळाक्षरे दिसतील (कॅप्चा कोड) ते खाली Enter Captcha Code च्या इथे टाकावे मग लगेच तुमची अर्ज केल्याची आताची स्तिथी काय आहे ते कळेल.
What are the documents required for PMFBY? PMFBY साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- शेतकऱ्याचे छायाचित्र (Passport Size Photo)
- ओळखपत्र (तुमचा फोटो असणारे एक ओळखपत्र; आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड आणि पासपोर्ट ई. यापैकी कोणतंही एक)
- रहिवासी पुरावा (राहत असलेल्या घरचा पत्ता असणारे एक ओळखपत्र; आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड आणि पासपोर्ट ई. यापैकी एक)
- शेतीचा 7/12, 8 अ दाखला
- शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा तलाठी किंवा सरपंचाचा दाखला
- बँक खात्याचे तपशील (अकाउंट नंबर, IFSC कोड, कॅन्सल चेक ई.)
What is the crop insurance mobile app? पीक विमा मोबाईल ॲप काय आहे?
पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकार सर्वार्थी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्याला 72 तासांच्या आत पीकांच्या नुकसानाची माहिती कृषी विभागाला द्यावी लागते, सर्वच शेतकऱ्यांना pmfby च्या अधिकृत वेबसाइट pmfby.gov.in वर जाऊन आपला अर्ज करणे जमेलच असे नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजना’ नामक मोबाईल अँप सुद्धा बनवला आहे.
मोबाईल अँपमुळे आता शेतकरी घरच्या घरी आपल्या मोबाइल वरून नुकसान झालेल्या पिकांचा अर्ज करू शकतो, स्वतःचे रेजिस्ट्रेशन करू शकता, त्यासोबत आपल्या अर्जाची सध्याची स्थिती तपासू शकतो, प्रीमियमचे दर आणि अनुदान याबद्दल माहिती मिळवू शकतो. आणि आता हे सर्व होणार आपल्या मोबिलेवरून.
App मुळे शेतकऱ्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही कारण अर्ज भरण्यापासून अर्जाची स्थिती पर्यंत सर्व गोष्टी तो App च्या माध्यमातून करू शकतो. आणि ते सुद्धा घर बसल्या.
Mobile App कसा डाउनलोड कराल?
- सर्व प्रथम आपल्या मोबाईलच्या Play Store मध्ये जा
- नंतर Search Box मध्ये ‘Crop Insurance’ असे type करून search करा.
- search केल्यानंतर PMFBY चा लोगो ‘Crop Insurance’ title असलेलं दिसेल.
- Install बटन वर क्लिक करून अँप install करा.
- App install झाल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीन वर ‘Crop Insurance’ नामक PMFBY चा लोगोसह App दिसेल.
- App वर क्लिक करून पंतप्रधान पीक विमा योजने संबंधी सर्व माहिती पाहू शकाल
FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न
पीक विम्यासाठी कोण पात्र आहे?
पीक विम्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शेती करणारे सर्व शेतकरी पात्र आहेत
प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा उपयोग काय?
अतिवृष्टी, दुष्काळ अथवा पिकांवर पडणारे रोग यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान म्हणून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांनवर विमा संरक्षण दिले जाते.
पीक कर्ज विमा अनिवार्य आहे का?
सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज विमा अनिवार्य नाही परंतु कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना वित्तीय संस्थाकडून कर्जामध्येच कव्हर केले जातील