Tar Kumpan Yojna 2025: शेतीला तारेचे कुंपण बांधा आणि ९०% पर्यंत अनुदान मिळवा – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Tar Kumpan Yojna

पिकांचे किंवा फळ बागेचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यांनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जंगली प्राणी, पाळीव जनावरे, पिकांचे किंवा फळ बागेत होणारी चोरी हे सर्व टाळण्यासाठी शेतीला तारेचे कुंपण असणे गरजेचे असते आणि म्हणून आता अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन Tar Kumpan Yojna 2025“ तार कुंपण अनुदान योजना” राबवत आहे.

महाराष्ट्र शासन तार कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी खांब खरेदी करण्यासाठी ९०% पर्यंतचे अनुदान प्रदान करते,

Tar Kumpan Yojna 2025: तार कुंपण योजना म्हणजे काय?

शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती काटेरी तारचं कुंपण बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा “तार कुंपण योजने”चा मुख्य उद्देश आहे. यामुळे पाळीव व वन्य प्राणी यांचा शेतामधील शिरकाव बंद होईल, तसेच पिकांचे आणि फळांचे होणारे नुकसान थांबेल आणि शेती अधिक सुरक्षित होईल.

किती अनुदान मिळेल?

सरकार या योजनेअंतर्गत ९०% पर्यंतचे अनुदान देत आहे, म्हणजे कुंपणाच्या साहित्याचा निम्म्या पेक्षा जास्त खर्च शासन भरून देणार आहे. उर्वरित पैशाची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. उदाहरणार्थ, दोन क्विंटल काटेरी तार + सुमारे ३० लोखंडी खांब असे साहित्य मिळेल. शासनाकडून मिळणारा खर्च जमिनीच्या क्षेत्रफळावर अवलंबून असेल ते पुढील प्रमाणे

  • १ ते २ हेक्टर शेतीसाठी → ९०% अनुदान
  • २ ते ३ हेक्टर शेतीसाठी → ६०% अनुदान
  • ३ ते ५ हेक्टर शेतीसाठी → ५०% अनुदान
  • ५ हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी → ४०% अनुदान

पात्रता आणि अटी

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • शेत जमिनीवर अतिक्रमण नसावे आणि ती शेती कायदेशीर मालकी किंवा भाडेतत्त्वावर अवलंबून असावी
  • पिकांना प्रत्यक्ष हानि झाली असल्याचा पुरावा असावा तसेच ग्राम विकास समिती / वन व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे

लागणारे कागदपत्रे

योजना अंमलात आणण्यासाठी खालील कागदपत्रांची गरज आहे:

  • सातबारा उतारा (7/12 उतारा) / गाव नमुना ८ (“गाव नमुना ८ अ”)
  • आधार कार्ड, बँक पासबुक IFSC कोड सहित
  • जात प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतीचा दाखला, इतर मालक असल्यास त्यांचे संमतीपत्र
  • वन विभागाचे / ग्राम विकास समितीचे / वन व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र, यांची आवशकता असेल तर

अर्ज प्रक्रिया

  • ऑफलाईन पद्धत जवळच्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन अथवा कृषी विभागाकडून फॉर्म मिळवून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
  • ऑनलाईन पद्धत DBT पोर्टलवर लॉगिन / नोंदणी करा. आपले आधार कार्ड, सगळे कागदपत्रे तयार ठेवा
  • “नवीन योजनेचा अर्ज” / “New Scheme Application” पर्याय शोधा किंवा “तार कुंपण योजना” असं विशिष्ट योजनेचं नाव असेल तर शोधा
  • अर्ज फॉर्म भरा, शेताचे माप, जमीन कागदपत्र, पिकांची माहिती आणि अन्य मागितलेले तपशील भरा
  • फोटो / नकाशा / अन्य आवश्यक जोड-दाखले अपलोड करा (जर ऑनलाइन असेल तर)
  • शेवटी सबमिट करा आणि पोचपावती / अर्ज क्रमांक मिळवा.

योजनेचे फायदे

  • पिकांचे नुकसान 70% पर्यंत कमी होऊ शकते, विशेषतः रात्री किंवा जनावरांच्या शिरकावामुळे होणारे नुकसान टळेल
  • उत्पन्नावर होणाऱ्या तोट्याची भरपाई होण्याची शक्यता वाढते
  • शेतकऱ्यांचा मानसिक ताण हलका होतो आणि पिकाची सुरक्षितता असल्याचा विश्वास वाटतो
  • वेळ व श्रमाची बचत होते – सतत पहारा ठेवण्याची गरज कमी होते

जर तुम्ही शेतकरी असाल आणि पिकांचे नुकसान होत असेल, तर हे योजनेसाठी अर्ज करायला अजिबात वेळ घालवू नका. छोटासा प्रयत्न पण मोठा फायदा!

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणतीही महत्त्वाची बातमी कधीही चुकवू नका. आमची सदस्यता घ्या.

ताज्या बातम्या

केंद्र सरकार योजना

Related News