२५ जुलै २०२५ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज Tim David टिम डेव्हिडने जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत क्रिकेट इतिहास रचला. डेव्हिडने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंतचे सर्वात वेगवान टी२० शतक ठोकले, टिमने हे शतक फक्त ३७ चेंडूत पूर्ण केले.
.
धावांचा पाठलाग करताना टीम खेळायला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे ८७ धावांवर ४ खेळाडु बाद झाले होते, या परिस्थीवर डेव्हिडने लगेच नियंत्रण मिळवले आणि वेस्ट इंडिसच्या गोलंदाजांवर हल्ला सुरु ठेवला. या डावात त्याने फक्त १६ चेंडूत ५० धावा केल्या आणि टी२० मध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा नवा विक्रमही प्रस्थापित केला. त्याने मार्कस स्टोइनिस आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या मागील अर्धशतक विक्रमांना मागे टाकले.
.
डेव्हिडच्या या धमाकेदार खेळीत ११ उत्तुंग षटकार आणि ६ सुंदर चौकारांचा समावेश होता. डेव्हिड २७५.६८ स्ट्राईक रेटने ३७ चेंडूत १०२ धावावर नाबाद राहिला.
या विक्रमी टी२० शतकासह डेव्हिडने २०२४ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध जोश इंगलिसने ४३ चेंडूत केलेल्या सर्वात जलद टी२० शतकाचा विक्रम मोडला. डेव्हिडच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट विक्रमांमध्ये एक नवीन विक्रम निर्माण झाला.
महत्वाचे म्हणजे, त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला २१५ धावांचे आव्हान सहजतेने पार करता आले, ऑस्ट्रेलियाने २३ चेंडू शिल्लक असताना सामना संपवला आणि ३-० असा व्हाईटवॉश मिळवून मालिका संपवली.
डेव्हिडने मिचेल ओवेन (१६ चेंडूत ३६) सोबत पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची मोठी भागीदारी केली, ज्यामुळे पाठलागात निर्णायक वळण आले, त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला २१५ धावांचे आव्हान सहजतेने पार करता आले. ऑस्ट्रेलियाने हा सामना २३ चेंडू शिल्लक असतानाच संपवला.
जागतिक स्तरावर, डेव्हिडचे ३७ चेंडूतले शतक हे कसोटी खेळणाऱ्या देशाविरुद्ध तिसरे सर्वात जलद टी२० शतक आहे, रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांनी ३५ चेंडूत केलेले शतक हा जागतिक विक्रम आहे.